

आमचे गाव डोंगरगाव
▪महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर गोंदिया जिल्हा आहे. हा जिल्हा अनेक वैशिष्ट्यांनी भरलेला आहे. त्या जिल्ह्यातील एक तालुका सडक/अर्जुनी आहे. या तालुक्यातील एक मोठे गांव. त्याचे नाव डोंगरगाव आहे. एकेकाळी निसर्ग संपन्न होता. गावाला लागून जंगल होते. जवळच एक डोंगर आणि एक पहाडी होती. ती पहाडी गावाला लागणाऱ्या गीट्टी, बोल्डर मुळे भूईसपाट झाली. त्या सपाट पहाडीच्या सानिध्यात टूमदार ग्रामपंचायत इमारत झाली. वृक्ष रोपणाने पहाडी भागात हिरवळ पसरली. गावाच्या सीमेवरून नाला वाहतो. पूर्वी दहा महिने वाहत असे.अलिकडे तो उन्हाळ्यात कोरडा पडतो. त्यावर उपाययोजना करा. जल समृध्दी आणा अशी मागणी सरकारकडे करण्यात आली. या नाल्याच्या दोन्ही बाजूला आजही विरळ जंगल आहे. उत्तरेकडे दुसरा डोंगर आहे. त्या डोंगराच्या पायथ्यापर्यंत गाव विस्तारला. दुसऱ्या बाजूला पटाचे मैदान आहे. डोंगर हिरवागार राखण्याची धडपड आहे. गावाच्या आजूबाजूला तलाव आहेत. या तलावांमध्ये पावसाळ्यात रंगीबेरंगी पाखराचे थवे येतात. ते दृश्य मनमोहक असते. गावासभोवार शेती आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात अनेक घरें झाली. त्यामुळे गावाचा आकार लांबला. उंचावरून बघितल्यास हिरवा गालिछा अंथरलेला दिसतो. त्या सौदर्यात या घरांची भर पडते. उन्हाळा तेवढा अपवाद असतो. निसर्गाने समृध्द असलेला गाव विकासात देखील समृध्द व्हावा. यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, गावकरी एकदिलाने प्रयत्नशील आहेत. गावात दर्जेदार शिक्षण, चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात. रस्ते, नाल्या, गटारी स्वच्छ असाव्यात. याबाबत गाव जागृत आहे. हे एक महत्त्वाचे व प्रगतिशील गाव आहे. २०११ च्या जनगणनेनुसार गावाची लोकसंख्या २३९१ असून गावात एकूण ५१४ कुटुंब आहेत. विविध समाजांचे हे कुटुंब गुण्यागोंविदाने राहतात. तंटामुक्ती समितीच्यावतीने तंटे गावातच मिटविले जातात. गावाचे प्रमुख प्रशासनिक कार्य 'डोंगरगाव ग्रामपंचायत' मार्फत पार पडते, तसेच हे गाव सडक अर्जुनी पंचायत समिती अंतर्गत येते.
गावाचा ग्रामसंख्या कोड ५३,८१,२६ असा आहे आणि पिनकोड - -४४१८०७ आहे. गोंदिया जिल्हा (जिल्हा कोड- ४७६) महाराष्ट्र राज्य (राज्य कोड- २७) यांच्या प्रशासनात या गावाचा विशेष उल्लेख आहे. ग्रामपंचायत कोड -१७५५४८ व ब्लॉक पंचायत कोड -४७४६ यांच्या आधारे गावाचे शासकीय नोंदणी व विकास आराखडे राबविले जातात.
गावाची वैशिष्ट्ये
▪डोंगरगाव (खजरी) हे ग्रामस्थांच्या ऐक्य, परंपरा आणि ग्रामीण संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे.
▪गावातील नागरिक शेती, शेतमजुरी, कुटीरउद्योग आणि विविध ग्रामीण व्यवसायांद्वारे आपले जीवन समृद्ध करतात.
▪शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकास या क्षेत्रांत ग्रामपंचायत सक्रियपणे काम करते.
▪गावाचा प्रशासनिक सहभाग सडक अर्जूनी उपविभागात महत्त्वपूर्ण आहे.
ग्रामपंचायतचे ध्येय
डोंगरगाव ग्रामपंचायतचे ध्येय गावातील नागरिकाचा सर्वांगीण विकास करणे. शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे. ग्रामीण पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, युवकांचे मार्गदर्शन आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत ग्रामपंचायत सतत कार्यरत आहे.
आमचे योगदान
- ग्रामीण विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी
-नागरिकांसाठी पारदर्शक व जबाबदार प्रशासन
-सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना देणे.बंधुभाव वाढविणे.
-गावाची स्वच्छता, पाणीपुरवठा व रस्त्यांच्या सोयीसाठी विशेष प्रयत्न
डोंगरगाव हे फक्त एक गाव नसून एक प्रगत, आत्मनिर्भर, आणि सुसंस्कृत ग्रामीण समाजाचा समूह आहे.
आमचे ध्येय (Our Mission)
डोंगरगाव ग्रामपंचायतचे ध्येय गावातील प्रत्येक नागरिकांच्या जीवनमानात उंचावणे. विकासाच्या योजना प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहचविणे. सर्वांगीण विकास साधणे.
-शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
-महिला सक्षमीकरण, युवकांचे मार्गदर्शन व ग्रामीण उद्योगांना चालना देणे.
- स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व इतर पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावणे.
- पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास याकडे विशेष लक्ष केंद्रित करणे.
- प्रत्येक कुटुंब आत्मनिर्भर करणे. गाव एक प्रगत, समृद्ध करणे. सुसंस्कृत व जबाबदार नागरिक घडविणे.
आमचा दृष्टिकोन (Our Vision)
▪डोंगरगाव ग्रामपंचायतचा दृष्टिकोन “सर्वांच्या सहभागातून सर्वांचा विकास” साध्य करणे.
▪पारदर्शक, जबाबदार आणि लोकाभिमुख प्रशासन सेवा देणे.
▪गावाला आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाची जोड देऊन ग्रामीण विकासाचा 'आदर्श मॉडेल ' तयार करणे.
▪परंपरा, संस्कृती आणि एकोप्याचे जतन करत, आत्मनिर्भर आणि सुशिक्षित समाज निर्माण करणे.
▪भावी पिढ्यांसाठी हरित, सुरक्षित आणि सक्षम डोंगरगाव घडवणे.परसोडीवरून गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. खजरीवरूनही सुमारे तेवढेच अंतर पडते.


Connect
Stay updated with village news and events.
Contact
info@dongargaon.com
+91-12345-67890
© 2025. All rights reserved.
